Last Modified: मुंबई , सोमवार, 3 मे 2010 (13:54 IST)
दहशतवाद्यांसाठी चांगले सरकार- सोळंकी
मुंबईतील ताज हॉटेलवर जेव्हा दहशतवाद्यांनी हल्ला चढवला, तेव्हा खासदार भुपेंद्र सोळंकी यांच्यासह दोन खासदारही हॉटेल ताजमध्ये अडकले होते. दहशतवाद्यांना चकवा देत सोळंकी आणि त्यांच्या मित्रांनी यातून आपली सुटका करून घेत पोलिस स्टेशन गाठून पोलिसांना याविषयीची माहिती दिल्याचे सोळंकी यांनी स्पष्ट केले आहे.
ताजमध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केल्यानंतर नागरिकांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली होती, यानंतर दहशतवाद्यांनी गोळीबार केल्याने काही जणांचा मृत्यू झाल्याचेही सोळंकींनी स्पष्ट केले.
केंद्रातील कॉग्रेस सरकार हे दहशतवाद रोखण्यात अपयशी ठरले असून, दहशतवाद्यांसाठी हे चांगलेच सरकार असल्याचा टोमणाही सोळंकी यांनी यावेळी लगावला आहे.