Last Modified: मुंबई , सोमवार, 3 मे 2010 (14:14 IST)
हल्ल्यात 'आयएसआय'चा हात?
ताज आणि ओबेरॉय या हॉटेलमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात पाकिस्तानची गुप्तचर संघटना आयएसआयचा हात असण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर देताना ठार झालेल्या दहशतवाद्यांकडून जप्त करण्यात आलेल्या बंदुका पाकिस्तानी सैन्यदलाच्या असल्याचे समोर आले आहे.
अतिशय नियोजनबध्द व प्रशिक्षित असल्यासारखे हल्ले दहशतवाद्यांनी केले गेले आहेत. दहशतवाद्यांकडे पाकिस्तानी लष्कराकडे असलेल्या रशियन बनावटीच्या अत्याधुनिक हेक्लर एण्ड कोच या बंदुका सापडल्या आहेत. या बंदुकांची निर्मिती कराची ऑर्डीनन्स फॅक्टरीतून केली गेली आहे. यामुळे या हल्ल्यात आयएसआयचा हात असण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.