1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Updated : मंगळवार, 14 मे 2024 (10:35 IST)

मुंबई मध्ये भलीमोठी होर्डिंग लोकांवर कोसळली, 70 जखमी तर 14 जणांचा मृत्यू व्हिडीओ आला समोर

ghatkopar
मुंबई मध्ये सोमवारी वादळ वाऱ्यामुळे एक अपघात घडला आहे. एक मोठी होर्डिंग कोसळली. ज्याच्याखाली दाबल्या गेल्यामुळे 14 लोकांचा मृत्यू झाला आहे. जेव्हा की 70 लोक गंभीर जखमी झाले आहे.  
 
मिळालेल्या माहितीनुसार 15 हजार वर्गफूट पेक्षा मोठी या होर्डिंगचे नाव लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये नोंद आहे. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, या होर्डिंगला विना परवानगी लावण्यात आले होते. 
 
सोमवारी अचानक आलेल्या वादळ वाऱ्यामुळे घाटकोपर परिसरातील समता कॉलोनी मधील रेल्वे पेट्रोल पंपावर एक भलीमोठी होर्डिंग कोसळली आहे. जिच्या खाली अनेक लोक दाबले गेलेत. ही घटना घडल्यानंतर पोलीस आणि फायर ब्रिगेड टीम पोहचली. तसेच रेस्क्यू ऑपरेशन सुरु करण्यात आले. 
 


ही घटना घडली तेव्हा पेट्रोल पंपावर अनेक लोक उपस्थित होते. होर्डिंग कोसळल्यामुळे इथे हाहाकार झाला. जखमींना रुग्णालयात नेण्यात आले. उपचार दरम्यान 14 लोकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.   
 
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेमध्ये मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत करण्याची घोषणा केली आहे. सोबतच जखमींचा रुग्णालयाचा पूर्ण खर्च सरकार करेल असे मुख्यमंत्री म्हणालेत. तसेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपति जगदीप धनखड यांनी देखील दुःख व्यक्त केले आहे.