मुंबईत बीएमडब्ल्यूने धडक बसून उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू, आरोपीला अटक
मुंबईच्या वरळीत हिट अँड रनचे प्रकरण समोर आले आहे. भरधाव वेगाने जाणाऱ्या एका बीएमडब्ल्यू कारने एका 28 वर्षीय तरुणाला धडक दिली. या अपघातात तो गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याचा एक आठवड्यानंतर 27 जुलै रोजी उपचाराधीन असता दुर्देवी मृत्यू झाला. विनोद कुमार लाड असे या मयत तरुणाचे नाव आहे.
विनोद घरी दुचाकीने परत येत असताना मागून येणाऱ्या बीएमडब्ल्यू कार ने धडक दिली. नंतर कार चालक तिथून पसार झाला.
स्थानिकांनी त्याला तातडीनं रुग्णालयात नेले त्याच्यावर उपचार सुरु झाले. मात्र विनोदचा एका आठवड्यांनंतर उपचाराधीन असता दुर्देवी मृत्यू झाला. या प्रकरणी कारचालकाला अटक केली आहे.
Edited By- Priya Dixit