मुंबई: सोबत राहण्यास नकार दिल्याने जिवलग मित्रावर २० वेळा चाकूने वार करत सर्वांसमोर गळा चिरला
मुंबईच्या धारावी परिसरात दिवसाढवळ्या झालेल्या हत्येच्या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. एका २० वर्षीय तरुणाची त्याच्याच मित्राने निर्घृणपणे हत्या केली. आरोपीने त्याच्यावर २० हून अधिक वेळा चाकूने वार केले आणि त्याचा गळा चिरला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या भीषण घटनेचा संबंध जुन्या वैमनस्याशी आणि वैयक्तिक वादाशी जोडला जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृताची ओळख अश्विन शिवकुमार नाडर अशी पटली आहे.व आरोपी असिम अख्तर खानने त्याच्यावर २० हून अधिक वेळा चाकूने वार केले आणि त्याचा गळा चिरला.
प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना सांगितले की, आरोपीने अश्विनला जीवे मारण्याची वारंवार धमकी दिली. तो ओरडून म्हणाला की, तो अश्विनला जिवंत सोडणार नाही. प्राथमिक तपासात असे उघड झाले की, अश्विन आणि आरोपी एकमेकांना ओळखत होते आणि त्यांच्यात बऱ्याच काळापासून वाद सुरू होता. पोलिसांना संशय आहे की, अश्विनने आरोपीसोबत राहण्यास नकार दिला होता. यामुळे संतापलेल्या आरोपीने अश्विनच्या हत्येचा कट रचला.
घटनेची माहिती मिळताच, पोलिसांचे एक पथक घटनास्थळी पोहोचले आणि आरोपीला ताब्यात घेतले. गंभीर जखमी झालेल्या अश्विनला तात्काळ सायन रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, जखमा इतक्या गंभीर होत्या की उपचारादरम्यान अश्विनचा मृत्यू झाला.
Edited By- Dhanashri Naik