बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020 (16:27 IST)

मुंबई विद्यापीठ : माहिती न पाठवणार्‍या महाविद्यालयांवर कडक कारवाई

मुंबई विद्यापीठाने सर्व संलग्नित महाविद्यालयांचे शैक्षणिक परीक्षण करण्यासाठी महाविद्यालयांकडून माहिती मागवली होती. 823 महाविद्यालयांपैकी काहींनी दिलेल्या मुदतीत माहिती पाठवली आणि काहींनी पाठवली नाही. माहिती न पाठवणार्‍या महाविद्यालयांवर कडक कारवाई करण्याचा निर्णय विद्यापीठ प्रशासनाने घेतला आहे. संलग्न महाविद्यालयांचे शैक्षणिक परीक्षण करण्यासाठी शासन स्तरावर समिती नेमण्यात आली होती. महाविद्यालयांच्या सोयीसाठी ऑनलाईन पोर्टल उपलब्ध करून देण्यात आले होते. सर्व महाविद्यालयांना लॉगिन आयडी आणि पासवर्ड देण्यात आला होता. तरीसुद्धा अनेक महाविद्यालयांनी 15 जानेवारी 2020 या दिलेल्या मुदतीत माहिती पाठवलेली नाही असे विद्यापीठ प्रशासनाने म्हटले आहे. 
 
शैक्षणिक परीक्षण झालेल्या महाविद्यालयांची माहिती सार्वजनिक केली जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थी, पालक यांना महाविद्यालयांमधील अभ्यासक्रम, फी, पायाभूत सुविधा यांसह अनेक उपक्रमांची माहिती विद्यापीठाच्या वेबसाईटवर एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे.