शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Updated : मंगळवार, 14 जून 2022 (21:45 IST)

आदित्य ठाकरे यांना गाडीतून उतरविण्याचा प्रयत्न; मुख्यमंत्री संतापले

uddhav aditya thackeray
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आजचा दौरा मानापमान नाट्य रंगले आहे. देहू दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बोलू न दिल्याने मोदी टीकेची धनी ठरले आहेत. तर, मुंबईतील विमानतळावरून राजभवनाकडे जाताना आदित्य ठाकरे यांना गाडीतून उतरविण्याचा प्रयत्न झाला. यामुळे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे चांगलेच संतापलेले पाहायला मिळाले.
 
पंतप्रधान मोदी  देहूत जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यानंतर पुढील कार्यक्रमासाठी मुंबईत दाखल झाले आहे. त्यांचे मुंबई विमानतळावर राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वागत केले. यानंतर विमानतळाकडून राजभवानाकडे निघताना आदित्य ठाकरेंना गाडीतून उतरविण्याचा प्रयत्न झाला. सुरक्षेचे कारण पुढे करुन आदित्य ठाकरेंना गाडीत बसण्यापासून रोखण्यात आले. यावर मुख्यमंत्री चांगलेच संतापले आहेत.