मुंबईत ऑस्ट्रेलियन नौदलाच्या महिला अधिकाऱ्याचा विनयभंग, ड्रायव्हरला अटक
मुंबईतील साऊथपोर्ट भागात ऑस्ट्रेलियन नौदलाच्या महिला अधिकाऱ्याचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. सदर घटना शनिवारी रात्री 11: 30 वाजता मुंबईच्या पोस्ट ट्रस्टच्या ग्रीनगेटवर घडली.
शनिवारी तिने जहाजावर येण्यासाठी एक वाहन भाड्याने घेतले. आरोपी वाहनचालकाने तिला अयोग्यरीत्या स्पर्श केले.तिने जहाजावरील सहकाऱ्यांना या घटनेबद्दल सांगितले नंतर पोलिसांना घडलेल्या प्रकाराची माहिती देण्यात आली.
हे प्रकरण यलोगेट पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचले. पोलिसांनी तातडीने कारवाई करत रविवारी आरोपीच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आणि आरोपी वाहन चालकाला अटक केली. आरोपीवर भारतीय दंड संहितेच्या कलम 74 अंतर्गत महिलेवर हल्ला केल्याबद्दल आणि तिचा विनयभंग केल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोमवारी आरोपीला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
Edited By - Priya Dixit