शुक्रवार, 1 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मंगळवार, 25 मार्च 2025 (11:05 IST)

शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्याने रस्त्याच्या मधोमध माजी नगरसेवकाला मारहाण केली, गैरवर्तन केल्याचा आरोप

Shinde group's female activist
कल्याणमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांने माजी नगरसेवक मोहन उगले यांना रस्त्याच्या मधोमध चोपून काढले. महिला कार्यकर्त्याने उगले यांच्यावर गैरवर्तन केल्याचा आरोप केला.
या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. शिंदे गटाचे माजी नगरसेवक मोहन उगले यांना पक्षाच्या महिला कार्यकर्त्या राणी कपोते यांनी जाहीरपणे कानशिलात लगावली. 
हे प्रकरण एका रस्त्याच्या बांधकामाच्या भूमिपूजनाशी संबंधित असून या दरम्यान माजी नगरसेवकाने राणी कपोते यांना अश्लीलपणे स्पर्श केल्याचा गंभीर आरोप केला. कपोते यांनी उगले यांच्या कानशिलात लगावली आणि म्हणाल्या. एक सक्षम महिला म्हणून स्वसंरक्षणासाठी मला जो धडा त्यांना शिकवायचा होता मी तो त्यांना शिकवला. 
Edited By - Priya Dixit