शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: बुधवार, 4 मे 2022 (22:12 IST)

जामीन मिळाला, मात्र राणांची आजची रात्रही तुरुंगातच

खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांची आज तुरुंगातून सुटका होणार नाहीये. कारण त्यांच्या सुटकेचे आदेश संबंधित दंडाधिकारी न्यायालयाकडून वेळेत मिळू शकलेले नाहीत. राणा यांच्या वकीलांची टीम उद्या सकाळी कोर्टाकडून सुटकेचे आदेश घेईल, त्यानंतर भायखळा आणि तळोजा कारागृहात जातील. त्यानंतर उद्या रवी राणा तुरुंगातून बाहेर येतील. तर नवणीत राणा या यापूर्वीच जे.जे. रुग्णालयात दाखल झालेल्या आहेत.
दरम्यान, खासदार नवनीत राणा यांची प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना भायखळा जेलमधून जेजे हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले होते. 12 दिवसांनी राणा दाम्पत्यांना जामीन मंजूर झाल्यानंतर त्यांच्या अमरावतीच्या घरी जल्लोष करण्यात आला.
 
राणा दाम्पत्य यांच्या जामीन अर्जावर शनिवारी झालेल्या सुनावणीत पोलिसांकडून राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जाला विरोध करताना म्हटलं होतं की देशात सद्य:स्थितीत हिंदुत्त्व हे एक मुख्य सूत्र बनले आहे आणि राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी या सूत्राचा राजकीय हितासाठी वापर केला जात आहे. राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर शनिवारी अतिरिक्त सत्र न्यायाधीश राहुल रोकडे यांच्यासमोर सुनावणी झाली होती. पण जामिनाबाबतचा निर्णय त्यांनी राखून ठेवला होता.