शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: बुधवार, 25 मार्च 2020 (16:52 IST)

टवाळखोर दुचाकीस्वाराने पोलिसांच्या अंगावर गाडी चढवली

वसईत बुधवारी एका टवाळखोर दुचाकीस्वाराने बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांच्या अंगावर गाडी चढवल्याची घटना घडली. यामध्ये पोलीस उपनिरीक्षक सुनील पाटील गंभीर जखमी झाले आहेत.

सुनील पाटील वसईच्या वाकनपाडा परिसरात बंदोबस्तावर होते. यावेळी काही टवाळखोर तरूण रस्त्यावर दुचाकी फिरवत होते. या तरुणांना पोलीस पकडायला गेल्यावर हे तरुण दुचाकीस्वार पळ काढत होते. त्यावेळी सुनील पाटील एका दुचाकीसमोर उभे राहिले. या दुचाकीस्वाराने कोणतीही पर्वा न करता भरधाव वेगातील दुचाकी सुनील पाटील यांच्या अंगावर चढवली. त्यामुळे सुनील पाटील गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर सध्या वसईच्या आयसीएस रुग्णालयात उपचार सुरु आहेत.