रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By

रायफलमधून चुकून गोळी सुटल्याने जवानाचा मृत्यू

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या पेडर रोडवरील ॲन्टेलिया निवासस्थानाजवळ सीआरपीएफ जवान पेट्रोलिंग करत होता. यावेळी नवरंग सोसायटीकडे जाणाऱ्या पाटणवाला रोडवर सीआरपीएफच्या जवानाचा रायफलमधून चुकून गोळी सुटल्याने मृत्यू झाला आहे.  देवदन रामभाई बकोत्रा (३०) असे या जवानाचे नाव असून तो मूळचा गुजरात येथील आहे.
 
सीआरपीएफ जवान बकोत्रा यांच्या रायफलमधून चुकून गोळी फायर होऊन ते जखमी झाले. उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले.