बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: बुधवार, 9 मार्च 2022 (15:17 IST)

देवेंद्र फडणवीस पोलिसांच्या ताब्यात, कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना आज पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी राजीनामा द्यावा यासाठी आज भाजपकडून भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होतं. त्यानंतर विधानभवनावर मोर्चा काढण्यात आला होता.
 
चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर, नितेश राणे हे देखील पोलिसांच्या ताब्यात आहे.