ठाण्यात भंगाराच्या गोदामाला भीषण आग,अग्निशमन दल पथक घटनास्थळी दाखल
ठाण्यातील एका भंगाराच्या गोदामाला मंगळवारी भीषण आग लागली. यावेळी कोणीही जखमी झाले नाही ही दिलासादायक बाब आहे. सध्या अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी आग विझवण्याचे प्रयत्न करत आहेत. शीळफाटा-महापे रस्त्यावरील एचपी पेट्रोल पंपाजवळ ही घटना घडली.आगीची माहिती मिळतातच अग्निशनदलाचे पथक घटनास्थळी पोहोचले. एएनआय या वृत्तसंस्थेने याबाबत माहिती दिली आहे.
हे गोदाम ठाण्यातील शिळफाटा-महापे रोड वर एचपी पेट्रोलपंपा जवळ आहे. आग विझवण्याचे काम वेगाने सुरु आहे.आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही.
अग्निशमन दलाचे अनेक बंब घटनास्थळी हजर आहेत. ही आग दुपारी लागली आणि काही वेळातच वेगाने पसरली. आगीचे लोळ उंचावर पाहता स्थनिकांनी अग्निशमनदलाला कळविले.घटनेची माहिती मिळतातच अग्निशमनदलाचे पथक घटनास्थळी पोहोचले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही.