शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: गुरूवार, 10 मार्च 2022 (18:03 IST)

चुकीच्या बाजूने वाहन चालवल्यास, तुरुंगवास होऊ शकतो

मुंबईच्या रस्त्यावर चुकीच्या बाजूने वाहन चालवणे आता महागात पडू शकते आणि एफआयआरसह वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर मोठा दंड ठोठावला जाऊ शकतो. मुंबईचे नवनियुक्त पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी जनसंपर्क सत्रादरम्यान सांगितले की, चुकीच्या दिशेने गाडी चालवणाऱ्यांना भारतीय दंड संहिता किंवा मोटार वाहन कायद्यातील संबंधित तरतुदींनुसार शिक्षा केली जाईल.
 
याशिवाय मुंबई महानगरातील काही प्रमुख रस्ते आणि उड्डाणपुलांवर मोटारसायकल शर्यतींचे आयोजन करण्यात येत असून, त्यांना पकडण्यासाठी लवकरच मोहीम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. उल्लंघन करणारे केवळ स्वत:साठीच नाही तर पादचारी आणि इतर वाहनचालकांनाही धोका निर्माण करतात, असेही ते म्हणाले. नियमांचे उल्लंघन करताना कोणी पकडले तर दीर्घकाळ कारवाईसाठी तयार राहा. असं त्यांनी स्पष्ट बजावले आहे.
 
मुंबई वाहतूक विभागाने चुकीच्या बाजूने वाहन चालवल्याबद्दल एकूण 107 एफआयआर नोंदवले आहेत. याशिवाय, शहरातील वाहतूक पोलिसांनी 14,000 हून अधिक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दलही दंड दिले आहेत.
 
मुंबईतील नागरिक मोठ्या संख्येने चुकीच्या बाजूने वाहन चालवत असल्याच्या तक्रारी करत होते. या पार्श्वभूमीवर नवनियुक्त पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई वाहतूक पोलिसांनी मोठी कारवाई करत नियमभंग करणाऱ्यांना दंड ठोठावले.

चुकीच्या बाजूने गाडी चालवल्याप्रकरणी पोलीस अधिकाऱ्यांनी 35 जणांना अटक केली. तसेच वाहतुकीचे उल्लंघन करणाऱ्या  6,401 जणांवर एफआयआर नोंदवण्यात आला आहे.केंद्रीय परिवहन मंत्रालयाच्या अहवालात चुकीच्या बाजूने वाहन चालवणे हे रस्ते अपघातांचे प्रमुख कारण असल्याचे नमूद करण्यात आले आहे. चुकीच्या बाजूने वाहन चालव्याने अपघाताचे प्रमाण वाढत आहे. या अपघात मुळे निष्पाप देखील बळी पडतात.या  अपघातांवर आळा घालण्यासाठी हे नियम लागू करण्यात आले आहे.