बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: गुरूवार, 10 मार्च 2022 (12:42 IST)

मालमत्ता करमाफी मोहर

मुंबईतील ५०० चौरस फूट किंवा त्यापेक्षा कमी चटईक्षेत्र असणाऱ्या निवासी मालमत्तांचा संपूर्ण मालमत्ता कर माफ करण्याच्या घोषणेवर बुधवारी विधिमंडळात शिक्कामोर्तब करण्यात आले. मुंबईकरांना १ जानेवारी २२ पासून करमाफीचा लाभ मिळणार आहे. नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी विधानसभेत यासंदर्भात मांडलेले विधेयक एकमताने संमत झाले. पाच वर्षांपूर्वी महापालिका निवडणुकीच्या वचननाम्यात मुंबईकरांची मालमत्ता करातून सुटका करण्याचे वचन शिवसेनेने दिले होते. त्यानुसार ३१ डिसेंबरला मुख्यमंत्र्यांनी मुंबईकरांचा मालमत्ता कर माफ करण्याची घोषणा केली होती. सध्याची वाढती महागाईमुळे पालिकेचा मालमत्ता कर सर्वसामान्य मुंबईकरांना परवडणारा नाही. त्यामुळे मालमत्ता करमाफी देण्यात येत असून मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.