1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
  4. E-coli bacteria found in drinking water at important railway stations in Mumbai

मुंबईतील महत्वाच्या रेल्वे स्थानकावर पिण्याच्या पाण्यात आढळला 'ई-कोलाय' जीवाणू

महाराष्ट्रातील मुंबईमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, कल्याण, भिवंडी रोड आणि लोणावळा या प्रमुख रेल्वे स्थानकांमधील वॉटर कुलरच्या पिण्याच्या पाण्यात घातक 'ई-कोलाय' जिवाणू आढळले आहे. अशी माहिती समोर आली आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार कॅग CAG – Comptroller and Auditor General च्या अलीकडील अहवालानुसार, देशभरातील काही महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पिण्याच्या पाण्यात ई-कोलायजीवाणू आढळले आहे. यामध्ये मुंबईतील चार महत्वाच्या स्थानकांचा देखील समेवश आहे. 
 
भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक (CAG) यांच्या ऑगस्ट २०२६ मधील ताज्या अहवालानुसार, मुंबईतील आणि उपनगरांतील प्रमुख रेल्वे स्थानकांवरील पिण्याच्या पाण्यात 'ई-कोलाय' (E. coli) हा घातक जीवाणू आढळला आहे. हा जीवाणू प्रामुख्याने मानवी विष्ठेच्या संसर्गामुळे पाण्यात पसरतो, ज्यामुळे प्रवाशांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे.
 
जीवाणू आढळलेली मुंबईतील प्रमुख रेल्वे स्थानके 
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, कल्याण, भिवंडी रोड, लोणावळा याठिकाणी तसेच देशभरात एकूण ८ स्थानकांवर हा जीवाणू आढळला यामध्ये हैदराबाद, कोइंबतूर, पालक्कड जंक्शन आणि मध्यपूर यांचाही समावेश आहे.
 
काय आहे ई-कोलाय?
ई-कोलाय हा जीवाणू मानवी किंवा प्राण्यांच्या विष्ठेत आढळतो. पाण्यात त्याची उपस्थिती म्हणजे मलदूषितता (faecal contamination) झाली आहे, असा संकेत असतो. काही प्रकारांमुळे अतिसार, अन्नविषबाधा, पोटदुखी आणि क्वचित प्रसंगी किडनीसंबंधी गंभीर समस्या उद्भवू शकतात.
 
आरोग्याला होणारे धोके
पाण्यात 'ई-कोलाय' जीवाणू असणे म्हणजे ते पाणी पिण्यासाठी अत्यंत असुरक्षित आहे. हे पाणी पिल्याने खालील आजार होऊ शकतात
अन्नाची विषबाधा, तीव्र पोटदुखी आणि उलट्याडायरिया / अतिसार
गंभीर संसर्ग झाल्यास किडनी निकामी होण्याचा धोका
 
रेल्वेच्या नियमांनुसार वर्षातून किमान दोनदा पाण्याची जैविक आणि रासायनिक तपासणी करणे बंधनकारक आहे. मात्र, अनेक स्थानकांवर अशी कोणतीही तपासणी केली गेली नाही. तसेच रेल्वे प्रशासनाची कारवाई आणि उपाययोजना हा अहवाल समोर आल्यानंतर रेल्वे मंत्रालयाने तातडीने पावले उचलली आहे:'
देशभरातील सुमारे २०,००० ठिकाणी अत्याधुनिक वॉटर फिल्ट्रेशन आणि मॉनिटरिंग सिस्टीम बसवण्याची घोषणा रेल्वेने केली आहे. जुन्या पाण्याच्या टाक्या बदलून, त्यांची नियमित स्वच्छता आणि रेल्वे बोर्ड पातळीवरून पाण्याच्या गुणवत्तेचे निरीक्षण केले जाईल.
 
प्रवाशांसाठी सुरक्षा सल्ला 
जोपर्यंत रेल्वे स्थानकांवरील पाण्याची गुणवत्ता सुधारत नाही, तोपर्यंत प्रवाशांनी स्वतःच्या घरून पाणी सोबत आणावे किंवा रेल्वे स्थानकावर प्रमाणित सीलबंद बाटलीबंद पाणी खरेदी करूनच पिण्यास प्राधान्य द्यावे.
Edited By- Dhanashri Naik
पुढील लेख
LIVE: '‘वीटो पॉवर’' मिळाल्याने देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे 'सुपर सीएम' बनले