शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: रविवार, 1 ऑगस्ट 2021 (16:37 IST)

आनंदाची बातमी! लालबाग चा राजा यंदा विराजमान होणार

गेल्या वर्षी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला बघता निर्बंध लावण्यात आले होते.कोरोनाच्या नियमांचे पालन करून सर्व सण व्यवस्थित पार पाडले.कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यामुळे आणि लसीकरण बऱ्याच प्रमाणे झाल्यामुळे यंदाच्या वर्षी लालबागचा राजा आपल्या भाविकांच्या भेटीस त्यांना दर्शन देण्यास येणार आहे.त्यामुळे ही भाविकांसाठी आनंदाची बातमी आहे.
 
यंदाच्या वर्षी कोरोनाचे प्रादुर्भाव कमी झाले आहे.आणि लावण्यात आलेले निर्बंध देखील शिथिल करण्यात आले आहे.तरी ही अद्याप कोरोना आपल्या मधून गेलेला नाही त्यामुळे सरकारने दिलेल्या सूचनांचे आणि कोरोनाचे नियम पाळता सण साजरा करावे.यंदाच्या वर्षी लालबागच्या राजाची 4 फुटी मूर्ती स्थापित केली जाणार.
 
भाविकांसाठी मात्र ऑनलाईनच दर्शन करण्याची सोय करण्यात येणार आहे.त्यामुळे गणेश भक्तांनी अजिबात गर्दी करू नये.आणि आपल्या लाडक्या बाप्पाचे लालबागच्या राजाचे दर्शन ऑनलाईन करावे.असं आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.