रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Updated : बुधवार, 16 जून 2021 (13:57 IST)

मुंबई-ठाणे कोकणमध्ये 17 आणि 18 जूनला मुसळधार पावसाची शक्यता

राज्यात मान्सून सक्रीय झाला असला तरी कोकणमधील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हे वगळता अन्य भागात पावसाने पुन्हा दडी मारली आहे. अधूनमधून तुरळक पाऊस होत आहे. मात्र, अजून आठवडाभर पावसाची शक्यता नाही. दरम्यान, मुंबई-ठाणे कोकणमध्ये मुसळधार पावसाचा  इशारा देण्यात आला आहे. 17 आणि 18 जूनला मुसळधार पावसाचा शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तविली आहे. 
 
राज्यात अजूनही सर्वत्र मौसमी पावसाचे आगमन झालेले नाही, त्यामुळे शेतकर्‍यांनी पेरणी करू नये, असे आवाहन कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी केले आहे. येत्या 17 ते 18 तारखेला राज्यात जोरदार पावसाचे आगमन होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. दरम्यान, जून अर्धा महिना संपला तरी अद्यापपर्यंत समाधानकारक पाऊस झाला नसल्याने शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.