बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मंगळवार, 2 फेब्रुवारी 2021 (07:53 IST)

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात बर्ड फ्लूचा शिरकाव

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात बर्ड फ्लूचा शिरकाव झाला असून ६ ठिकाणी कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण झाली आहे. महापे इथल्या २ आणि घणसोली इथल्या ४ पोल्ट्री मधल्या कोंबड्यांना बर्ड फ्लू झाल्याचे निदान झालं आहे. या ठिकाणचे १० नमुने २५ जानेवारी रोजी चाचणीसाठी पाठवण्यात आले होते, त्याचा रिपोर्ट आला असून, या कोंबड्यांना बर्ड फ्लू ची लागण झाल्याचं समोर आलं आहे. खबरदारीचा उपाय म्हणून या ठिकाणाहून १ किलोमीटर अंतरावर असलेल्या सर्व कोंबड्या आणि अंडी नष्ट करण्याचे आदेश ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ राजेश नार्वेकर यांनी दिले आहेत. तसेच ६ कावळे आणि २ कबुतरे यांच्या चाचणीचे निकाल येणे बाकी आहे.