गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: सोमवार, 6 फेब्रुवारी 2023 (10:55 IST)

Kala Ghoda Art Festival 2023 कलाप्रेमींसाठी अतिशय खास काळा घोडा महोत्सव

Kala Ghoda Art Festival 2023 काळा घोडा महोत्सव 2023 हा नृत्य, कला आणि संगीत प्रेमींसाठी एक विशेष उत्सव आहे. जो मुंबईत साजरा केला जातो. काळा घोडा कला महोत्सव हा नऊ दिवसांचा वार्षिक उत्सव असून दरवर्षी फेब्रुवारीच्या पहिल्या शनिवारी सुरू होऊन दुसऱ्या रविवारी संपतो. तर यंदा हा फेस्टिव्हल 4 फेब्रुवारीपासून सुरू झाला असून तो 12 फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे.
 
या महोत्सवात नृत्य, संगीत, चित्रकला, हस्तकला, ​​ग्राफिक्स आर्ट, सिनेमा, साहित्य याशिवाय अनेक कला प्रकार पाहायला मिळतात. 'काळा घोडा फेस्टिव्हल' मध्ये अद्भुत कलाकारांची सुंदर कलाकृती आणि परफॉर्मन्स पाहण्याची संधी मिळते. त्यामुळे तुम्ही कलाप्रेमी असाल तर या महोत्सवाला भेट देण्याची ही संधी गमावू नका.
काळा घोडा कला महोत्सवाचा इतिहास
काळा घोडा कला महोत्सव हा मुंबईत आयोजित केले जाणारा एक कला महोत्सव आहे जो 1999 मध्ये काळा घोडा संस्थेने सुरू केला होता. हा महोत्सव दक्षिण मुंबई परिसरात काळ्या घोड्याची मूर्ती असलेल्या ठिकाणी आयोजित केला जातो. येथील काळ्या घोड्याची ही मूर्ती इंग्रजांच्या काळापासून आहे.
 
महोत्सवाला भेट देण्याची वेळ सकाळी 10 ते रात्री 10 अशी आहे. या महोत्सवात जाण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचे तिकीट काढावे लागणार नाही. तुम्ही विविध कार्यक्रमांचा 9 दिवस विनामूल्य आनंद घेऊ शकता.
 
काळा घोडा महोत्सवातील प्रमुख आकर्षणे
येथे तुम्हाला विविध प्रकारच्या कलांची माहिती मिळेल. मोठ्यांसोबतच मुलांच्या मानसिक आणि शारीरिक विकासासाठी अनेक उपक्रम उपलब्ध आहेत. येथे येऊन तुम्ही कपडे, शूज, पिशव्या आणि सजावटीच्या वस्तूंची खरेदी करण्याचा आनंद घेऊ शकता.
येथे भारतीय शास्त्रीय आणि समकालीन ते अनेक आंतरराष्ट्रीय नृत्य प्रकाराचे एक विस्तृत संयोजन ब‍घायला मिळेल. तसेच अनेक शीर्ष कलाकार येथे संगीत प्रस्तुत देत असल्यामुळे वातावरणात वेगळाच आनंद पसरत आहे. दरवर्षी येथे 100 ते 150 स्टॉल लावले जातात ज्यात स्थानिक कारीगर आणि शिल्पकार अनेक वस्तूंचे प्रदर्शन करतात.