सोमवार, 25 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मुंबई , गुरूवार, 11 मार्च 2021 (10:45 IST)

करंज पाणबुडी भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल

सायलेंट किलर म्हणून ओळखली जाणरी आयएनएस ‘करंज' पाणबुडी नौदलात दाखल झाली. मुंबईतील वेस्टर्न कमांडच्या नौदल मख्यालयात  लष्करी परंपरेनुसार ‘करंज' पाणबुडीला युध्द नौकांमध्ये सामील करण्यात आले.
 
केंद्र सरकारच्या मेक इन इंडिया मोहिमेंतर्गत फ्रान्सच्या मदतीने स्वदेशी बनावटीच्या या पाणबुडीची बांधणी मुंबईच्या माझगाव डॉकमध्ये करण्यात आली.
 
सर्व यशस्वी चाचण्यानंतर बुधवारी ही पाणबुडी नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली आहे. कलावरी क्लासची ‘करंज' तिसरी पाणबुडी आहे.
 
* 221 फूट लांब, 40 फूट उंच, खोली 19 फूट, वजन 1565 टन आहे.
* सुमारे 11 किमी लांबीची पाइप फिटिंग्ज करण्यात आली आहे.
* करंज पाणबुडी 45 - 50 दिवस पाण्यात राहण्याची क्षमता.
* स्टील्थ तंत्रज्ञानामुळे ही पाणबुडी रडारवर येऊ शकत नाही.
* कोणत्याही हवामानात काम करण्यास सक्षम.
* पाणबुडीचा सर्वोच्च वेग 22 नोट्‌स आहे.
* करंज पाणबुडीत 360 बॅटरी सेल आहेत. एका बॅटरे सेलचे वजन 750 किलो ग्रॅम आहे.
* बॅटरीमुळे ही पाणबुडी 6500 नॉटिकल माईल्स म्हणजे सुमारे 12हजार किमरचा प्रवास करु शकते.
* 1250 किलोवॅटची दोन डिझेल इंजिन
* या पाणबुडीमध्ये मॅग्नेटाइज्ड प्रोपल्शन मोटर वापरण्यात आली आहे. त्यामुळे  पाणबुडीतून आवाज बाहेर येत नसल्याने शत्रूला या पाणबुडीचा शोध घेणे कठीण जात.