चविष्ट आंबट-गोड दह्याची करंजी

Last Modified मंगळवार, 3 नोव्हेंबर 2020 (12:23 IST)
साहित्य -
150 ग्रॅम उडीद डाळ, 50 ग्रॅम मुगाची डाळ, किशमिश, काजू चुरी, 2 मोठे चमचे खवा, 4 कप दही, 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, कोथिंबीर बारीक चिरलेली, 2 लहान चमचे जिरेपूड, 1 लहान चमचा काळीमीर पूड, 1 चमचा चाट मसाला, पादेलोण, 1 चमचा पिठी साखर, 1 कप गोड चटणी, 1 कप हिरवी चटणी, मीठ चवी प्रमाणे, तेल तळण्यासाठी.

कृती -
दह्याची करंजी बनविण्यासाठी एक दिवसापूर्वी रात्री उडीद डाळ आणि मुगाची डाळ भिजत टाकावी. दुसऱ्या दिवशी वाटून घ्यावी. हे लक्षात ठेवा की डाळ जास्त ओलसर नसावी. आता या वाटलेल्या डाळीत मीठ, कोथिंबीर, मिरच्या, किशमिश, काजू मिसळा आणि चांगल्या प्रकारे फेणून घ्या.

खव्यात पिठी साखर मिसळा आणि तसेच पडू द्या. या नंतर एक सुती कापड घेऊन त्या कापड्याला ओले करून पिळून पसरवून द्या. डाळीच्या सारणाचा लहान लहान गोळ्या बनवून त्यांमध्ये खवा भरून द्या. नंतर याला बंद करून करंजीचा आकार द्या. करंज्या केल्यावर याला ओल्या कपड्यामध्ये ठेवून द्या. अश्या पद्धतीने सर्व डाळीच्या सारणाच्या करंज्या बनवून ठेवून घ्या.

आता कढईत तेल गरम करण्यासाठी ठेवा. या तेलात करंज्या तळून घ्या. तळलेल्या करंज्या एका पाण्याच्या भांड्यात पाण्यात घाला. दही तयार करण्यासाठी एका भांड्यात दही घ्या आणि त्याला चांगल्या प्रकारे घुसळून घ्या. दह्यात काळी मिरपूड, काळेमीठ, जिरेपूड मिसळा. या नंतर पाण्यात भिजवलेल्या करंज्यांना पाण्यातून काढून घट्ट पिळून दह्यात बुडवून द्या. काही वेळ आपली इच्छा असल्यास थंड होण्यासाठी फ्रिज मध्ये ठेवून द्या. काही वेळानंतर काढल्यावर गोड आणि तिखट हिरव्या चटणी टाकून वरून चाट मसाला भुरभुरून सर्व्ह करा.


यावर अधिक वाचा :

"जपा वनस्पती, करा त्याचा उपयोग, निरामय जीवनासाठी"

विविध वनस्पतीचा मौल्यवान खजीना, अमूल्य आहे, जपा वनस्पती ना,

धनकवडीत राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात महिलेचा मृतदेह ...

धनकवडीत राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात महिलेचा मृतदेह सापडला
पुण्यातील धनकवडी परिसरातील एका घरामध्ये रक्ताच्या थारोळ्यात एका महिलेचा मृतदेह सापडला. आज ...

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सतर्कतेमुळे ‘ती’ बचावली

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सतर्कतेमुळे ‘ती’ बचावली
संगमनेर तालुक्यातील कौठे कमळेश्वर गावात होणारा अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखण्यात ...

ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांसाठी उद्योगांना विशेष प्रोत्साहन; ...

ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांसाठी उद्योगांना विशेष प्रोत्साहन; शासन निर्णय जारी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याची ऑक्सिजनची गरज पूर्ण करण्यासाठी शासनाने ‘मिशन ऑक्सिजन ...

‘लसीच्या तुटवड्याला केंद्र सरकारच जबाबदार’; सीरम ...

‘लसीच्या तुटवड्याला केंद्र सरकारच जबाबदार’; सीरम इन्स्टिट्यूटचा धक्कादायक आरोप
गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशभरात थैमान घातलं आहे. कोरोनाच्या ...

जागतिक योग दिवस 2021 विशेष : योगाचा संपूर्ण इतिहास जाणून ...

जागतिक योग दिवस 2021 विशेष : योगाचा संपूर्ण इतिहास जाणून घ्या
योगाच्या अभ्यासाच्या इतिहासाला आपण दोन भागात विभागू शकतो.प्रथम हिंदू परंपरेमधून मिळालेला ...

International Yoga Day 2021: योगासनाचे हे नियम जाणून घ्या

International Yoga Day 2021: योगासनाचे हे नियम जाणून घ्या
योगा हा आपल्या जीवनाचा एक भाग बनला आहे. आजच्या वेगवान जीवनात, जिथे लोक स्वत: ला निरोगी ...

फळ आणि भाज्यांमध्ये आढळणाऱ्या पोषक घटकांची माहिती घेऊ या

फळ आणि भाज्यांमध्ये आढळणाऱ्या पोषक घटकांची माहिती घेऊ या
सध्याच्या महागाईच्या काळातही आरोग्याची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. कारण दुसरीकडे कोरोना ...

रोग प्रतिकारक क्षमता वाढविण्यासाठी आले पाक वडी बनवा

रोग प्रतिकारक क्षमता वाढविण्यासाठी आले पाक वडी बनवा
पावसाळा आपल्या बरोबर आजार घेऊन येतो,सर्दी ,पडसं,खोकला हे सामान्य आहे.आपण आपली रोग ...

जागतिक संगीत दिन 2021 विशेष :सर्वप्रथम संगीत दिवस कुठे ...

जागतिक संगीत दिन 2021 विशेष :सर्वप्रथम संगीत दिवस कुठे साजरा केला आणि संगीताचे महत्व काय आहे?
दर वर्षी 21 जून रोजी संगीत दिवस साजरा केला जातो.याला फेटे डी ला म्युझिक असे ही ...