रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शनिवार, 18 नोव्हेंबर 2023 (20:27 IST)

वांद्रे भागात गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट; 8 जण जखमी

Explosion
मुंबई : मुंबईच्या वांद्रे भागात एक दुर्दैवी घटना घडली आहे. एलपीजी गॅस सिलिंडरच्या स्फोटामध्ये ८ जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान आगीच्या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या होत्या. त्यानंतर आग आटोक्यात आणण्यात आली आहे.
 
या घटने बाबत मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी 6.15 च्या सुमारास हा स्फोट झाला. वांद्रे येथील गजाधर रोड परिसरात वन प्लस स्ट्रक्चर असलेल्या घरात गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. सिलिंडर स्फोटाच्या घटनेत घरातील आठ जण जखमी झाले आहेत. सर्व जखमींना नजीकच्या भाभा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.
 
स्फोटामुळे इमारतीच्या पहिल्या मजल्यावर आग लागली होती. या आगीमध्ये आठ जण होरपळल्याची माहिती आहे. काहींची प्रकृती गंभीर असल्याचं कळतंय.