रविवार, 28 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: गुरूवार, 11 जून 2020 (09:43 IST)

मनसेचे मुंबईमध्ये ‘फक्त एक मिनिटे हॉर्न वाजवा आंदोलन

राज्यात अनलॉक १ सुरु झाला तरी रिक्षा, टॅक्सी इतर वाहनांवर कारवाई करण्यात येत आहे. यामुळे मनसेची वाहतूक सेना आक्रमक झाली आहे. येत्या शुक्रवारी संध्याकाळी ५ वाजता मनसेने मुंबईमध्ये ‘फक्त एक मिनिटे हॉर्न वाजवा आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनलात सहभागी होणाऱ्या सर्व रिक्षा, टॅक्सी तसेच इतर वाहनधारकांनी एक मिनिटे हॉर्न वाजवून सरकारला जागे करावे असे आवाहन मनसेच्या वाहतूक सेनेच्या वतीने देण्यात आला आहे.
 
राज्यात रिक्षा टॅक्सी सुरु नसल्याने अनेक ठिकाणी मनमानी पद्धतीने रुग्णांना भाडे आकारण्यात येत आहे. तेच जर रिक्षा, टॅक्सी चालकांना परवानगी दिली तर सर्वसामान्य जनतेसाठी सोयीस्कर जाईल. कोविड १९ च्या नियमांनुसार आवश्यक सुरक्षा उपकरणे वापरुन रिक्षा, टॅक्सी सुरु करण्याची सरकारने परवानगी द्यावी. ज्या रिक्षा, टॅक्सी चालकांना शासनाने परवाना दिले आहेत त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. ओला, उबेरसारख्या कंपन्यांच्या गाड्यांवर कारवाई करण्यात येत नाही, रिक्षा, टॅक्सी चालकही कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी हे काम करतात मग त्यांना परवानगी का नाही? असा सवाल हेनसे वाहतूक सेनेचे अध्यक्ष संजय नाईक यांनी विचारला आहे.