शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: सोमवार, 4 जानेवारी 2021 (08:30 IST)

दिलासादायक माहिती, मुंबईत एका दिवसातली सर्वात कमी कोरोना मृत्यूसंख्येची नोंद

मुंबईकरांसाठी मोठी दिलासादायक माहिती मुंबई महानगर पालिकेने जाहीर केली आहे. पालिकेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार रविवारी दिवसभरात फक्त ३ कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मार्च महिन्यापासून अर्थात मुंबईसह देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आल्यापासून आता पर्यंतची ही मुंबईतली एका दिवसातली सर्वात कमी मृत्यूसंख्या असल्याचं स्पष्ट झालं आहे.
 
रविवारी दिवसभरात मुंबईत एकूण ५८१ नवे कोरोनाबाधित सापडले असून एकूण बाधितांची संख्या २ लाख ९५ हजार २४० इतकी झाली आहे. तर २४ तासात तब्बल ६९७ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. मुंबईतल्या कोरोना मृतांचा आकडा ११ हजार १३५ जरी झाला असला, तरी गेल्या ९ महिन्यात पहिल्यांदाच दिवसभरात अवघ्या ३ मृतांची नोंद करून मुंबईने रेकॉर्डब्रेक कामगिरी केली आहे. ३१ मार्च रोजी मुंबईत सर्वात कमी ७ मृत्यू झाल्याची नोंद आहे. त्यानंतर थेट २ डिसेंबरला मुंबईत ९ मृत्यू झाले होते. त्यानंतर २ जानेवारी रोजी देखील मुंबईत ७ मृत्यूंची नोंद करण्यात आली. मात्र रविवारी फक्त ३ मृत्यू झाल्यामुळे हा आकडा आता शून्याकडे वाटचाल करू लागला आहे.