शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शनिवार, 26 सप्टेंबर 2020 (17:05 IST)

केईएममध्ये कोविशिल्ड लशीच्या चाचणीला सुरु

मुंबईच्या केईएम रुग्णालयात आजपासून कोविशिल्ड लशीच्या चाचणीला सुरुवात होणार आहे. कोव्हिशिल्ड लशीची ही तिसऱ्या टप्प्यातील चाचणी आहे. आज केईएम रुग्णालयातील तिघांना ही लस टोचली जाईल. काही दिवसांपूर्वीच केईएम रुग्णालयातील कोविशिल्ड लशीच्या चाचणीसाठी एथिक कमिटीने मान्यता दिली होती. यानंतर रुग्णालय प्रशासनाकडून तात्काळ स्वयंसेवकांच्या स्क्रीनिंगला सुरुवात करण्यात आली होती. आतापर्यंत लस घेण्यासाठी इच्छूक असणाऱ्या १३ स्वयंसेवकांचे स्क्रिनिंग पूर्ण झाले असून १० जणांचा रिपोर्ट येणे बाकी आहे. आणखी १० जणांचे स्क्रिनिंग केले जाणार आहे. केईएम रुग्णालयात एकूण १०० जणांवर कोव्हिशिल्ड लसीची चाचणी केली जाणार आहे. 
 
आरटीपीसीआर आणि अँटिबॉडीज चाचणी निगेटिव्ह आलेल्या तीन स्वयंसेवकांना  लस टोचण्यात येईल. लस दिल्यानंतर तिघांवर काही परिणाम होतो का, हे तपासले जाईल. एक महिन्यांने पुन्हा लसीचा दुसरा डोस दिला जाईल, अशी माहिती केईएम रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी दिली.