गुरूवार, 21 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Updated : बुधवार, 12 एप्रिल 2023 (13:15 IST)

Mumbai Local Train दहिसर - बोरिवली दरम्यान मुंबई लोकल मार्गावर ओव्हरहेडची समस्या, रेल्वे सेवा प्रभावित

Mumbai Local Train
लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. वेस्टर्न लाईनच्या अप-फास्ट मार्गावरील दहिसर ते बोरिवली दरम्यान OHE वायरमध्ये (ओव्हरहेड वायर) तांत्रिक बिघाड झाल्यामुळे मुंबई उपनगरीय लोकल सेवा प्रभावित झाली. 
 
यासंदर्भातील घोषणा स्थानकांवर तसेच गाड्यांमध्ये करण्यात आल्याची माहिती पश्चिम रेल्वेने दिली. तर लोकल गाड्या वळवण्यात आल्या. युद्धपातळीवर काम सुरू झाले असून आता लोकल सेवा पूर्ववत करण्यात आली आहे.