शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शनिवार, 18 डिसेंबर 2021 (16:50 IST)

नववर्ष सेलिब्रेशन नियमावली जारी

ख्रिसमसआणि नववर्ष तोंडावरआलेले असतानाच जगभरात ओमिक्रॉन व्हेरीएंटने दहशत निर्माण केली आहे.  प्रचंड वेगाने कोरोनाचा हा नविन व्हेरिएंट पसरत असून, मुंबई महापालिका प्रशासनाने खबरदारीचे उपाय हाती घेतले आहेत. काय आहेनियमावली जाणून घ्या?
 
मैदान, रेसकोर्स, लॉन अशा स्वरुपाच्या मोकळ्या जागेवर होणाऱ्या पार्टीसाठी क्षमतेच्या २५ टक्के आणि जास्तीत जास्त २०० यापैकी जे लहान असेल तेवढ्या प्रमाणातच लोकांना सहभागी होण्याची परवानगी
बँन्क्वेट हॉल, बंदीस्त जागी क्षमतेच्या ५० टक्के मर्यादेपर्यंतच प्रवेश दिला जाणार
३१ डिसेंबर आणि ख्रिसमस निमित्त घरी होणाऱ्या पार्ट्यांवर महापालिकेची करडी नजर
नियमांचं उल्लंघन करणाऱ्या संबंधित रेस्टॉरंट मालक, हॉटेल मालक यांच्यावर नियमाप्रमाणे कारवाई होणार
मुंबईतील प्रत्येक वॉर्डमध्ये महापालिकेची ४ पथकं तैनात असतील
 
महाराष्ट्रात ओमायक्रॉनचे १५ कोरोनाचे ६९०३ Active रुग्ण
महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने १७ डिसेंबर रोजी संध्याकाळी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात ओमायक्रॉनचे १५ तर कोरोनाचे ६ हजार ९०३ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.