शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शुक्रवार, 17 सप्टेंबर 2021 (20:51 IST)

मुंबईत गणेश विसर्जनासाठी पालिकेची जय्यत तयारी

आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचे 10 दिवसानंतर अनंत चतुर्दशीच्या दिवशी विसर्जन होणार आहे. गणेश चतुर्थी ला आपल्या लाडक्या बाप्पाचे आगमन झाल्यावर दीड दिवसाचा गणपती,पाच दिवसाच्या गणपती चे आज 7 दिवसाच्या गणपती बाप्पाचे विसर्जन निर्विघ्न पार पडले. आता दहा दिवसाच्या गणपती बाप्पांचे विसर्जन अनंत चतुर्दशीला होणार आहे. या साठी मुंबई महा पालिका प्रशासन विसर्जनासाठी सज्ज असल्याची माहिती पालिका जनसंपर्क विभागाचे प्रमुख अधिकाऱ्यांनी दिली आहे. प्रशासनाने मुंबई महापालिका आयुक्त इकबाल चाहूल,अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे,उप आयुक्त आणि गणेशोत्सव समनव्यक यांच्या नेतृत्वाखाली अनंत चतुर्दशी 19 सप्टेंबर रोजी गणेश मूर्ती विसर्जनाची चोख व्यवस्था केली आहे.

महापालिकाने दहा दिवसाच्या गणप्तीसाठी विसर्जनासाठी शहर आणि उपनगर विभागात सुमारे 25 हजार कामगार,कर्मचारी,अधिकाऱ्यांची व्यवस्था केली आहे.गर्दी टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात कृत्रिम तलाव निर्माण केले आहे.जेणे करून कोरोनाच्या पार्श्वभूमीला बघता.गर्दी होऊ नये.या व्यतिरिक्त फिरते विसर्जन स्थळे देखील उभारले आहे.तसेच पालिका क्षेत्रात 73 ठिकाणी नैसर्गिक विसर्जन स्थळी देखील असणार आहे.
 
मुंबईतील गिरगाव,दादर,माहिम आदी चौपाट्यांसह विविध नैसर्गिक व कृत्रिम विसर्जन स्‍थळी जीवरक्षकांची नेमणूक केली आहे.त्याचबरोबर गणेश विसर्जनासाठी येणारे वाहन समुद्र किना-यावरील रेतीमध्ये अडकू नयेत,यासाठी नैसर्गिक विसर्जन स्थळी तात्पुरते वाहन मार्ग तयार करण्यात आले आहेत.या साठी स्टील प्लेट ची व्यवस्था केली आहे.तसेच, विविध ठिकाणी निर्माल्य कलश,निर्माल्य वाहन,नियंत्रण कक्ष,प्राथमिक उपचार केंद्र, रुग्णवाहिका इत्यादींची व्यवस्था करण्यात आली आहे.या व्यतिरिक्त स्वागतकक्ष,तात्पुरती शौचालये,फ्लड लाईट,सर्च लाईट, निरीक्षण मनोरे आणि नैसर्गिक विसर्जन स्थळांच्या ठिकाणी मोटर बोट व  जर्मन तराफा इत्‍यादी सेवा-सुविधा व साधनसामुग्रींचीही व्‍यवस्‍था करण्‍यात आली आहे.
 
मुंबईचे गेल्या मार्च 2020 पासून कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला. त्यामुळे गतवर्षीसुद्धा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये व रुग्णांची संख्या वाढू नये यासाठी राज्य सरकार व मुंबई महापालिकेने गणेशोत्सवासाठी काही निर्बंध घातले होते. त्यानुसार यंदाही या निर्बंधांचे पालन करणे बंधनकारक केले आहे. कोरोना नियमांचे पालन करणे म्हणजे सुरक्षित अंतर राखणे, सतत हात स्वच्छ धुणे, तोंडाला मास्क लावणे आणि सॅनिटायझरचा वापर अधुनमधून करणे आदी नियमांचे पालन करून गणेश भक्तांना घरगुती व सार्वजनिक गणेश मूर्तींचे विसर्जन करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
 
कोरोना कालावधीत विसर्जनासाठी होणारी गर्दी टाळण्यासाठी पालिकेने घरगुती मूर्तीचे विसर्जन घरच्या घरी करावे.या साठी शाडूची मूर्ती आणावी आणि त्याचे घरीच विसर्जन करावं.असे सांगण्यात आले आहे. विसर्जनासाठी 5 व्यक्तीच असावेत.शक्यतो त्यांनी कोरोनाच्या लसीकरणाचे दोन्ही डोस घेतलेले असावे.तसेच दुसरा डोस घेऊन 15 दिवस झालेले असावे.असे ही प्रशासनाने सूचित केले आहे.