सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शुक्रवार, 17 सप्टेंबर 2021 (09:21 IST)

मुंबई: BKC पूल कोसळल्यामुळे 13 जण जखमी झाले

देशाची आर्थिक राजधानी मुंबईच्या वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये शुक्रवारी सकाळी निर्माणाधीन पूल कोसळला. या अपघातात 13 जण जखमी झाले आहेत. शुक्रवारी पहाटे 4:40 वाजता हा अपघात झाला. अपघातात 13 जण जखमी झाले, त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
 
घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले, जखमींना ढिगाऱ्यातून बाहेर काढले आणि त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. बचाव कार्यात गुंतलेल्या अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की घटनास्थळाची चौकशी केली जात आहे आणि ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांची शक्यता लक्षात घेता, टीम शोध मोहिमेत गुंतली आहे.
 
या प्रकरणात डीसीपी (झोन 8) मंजुनाथ सिंगे यांनी सांगितले की, बीकेसी मुख्य रस्ता आणि सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोडला जोडणाऱ्या निर्माणाधीन उड्डणपुलाचा एक भाग 4.30 च्या सुमारास कोसळला. यामध्ये 13 जण किरकोळ जखमी झाले आहेत. ते म्हणाले की, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि कोणत्याही बेपत्ता व्यक्तीची माहिती नाही.