शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Updated : बुधवार, 28 सप्टेंबर 2022 (13:47 IST)

शरीरसुखाची मागणी करणाऱ्या शिवसेना विभागप्रमुखाला महिलेनं चपलेनं हाणलंय

shivsena jitu khede
जितू खाडे असं या शिवसेना विभागप्रमुखाचं नाव असून त्याला रिक्षातच एका महिलेनं चपलेनं चोपलं आहे. फोन कॉलवरुन सेक्ससाठी महिलांची मागणी करत असल्याचा आरोप महिलेनं केला आहे. याच कारणानं संतप्त महिलेनं जितू खाडे (Jitu Khade) याला भररस्त्यात रिक्षामध्ये चपलेनंच चोप दिलाय.  ही घटना विरार पूर्वेतील साईनाथ नगरची आहे. या घटनेचा व्हिडीओदेखील चांगलाच व्हायरल (Video Viral) झाला आहे. याप्रकरणी पोलिस तक्रारदेखील करण्यात आली असून सध्या जितू खाडे हा फरार आहे. पोलिस याप्रकरणी आता अधिक तपास करत असून फरार जितू खाडेला शोधण्याचा प्रयत्न सुरु आहेत. पीडित महिला ही विरारमधील रहिवासी असून या महिलेनं चक्क रिक्षातच शिवसेनेच्या विभागप्रमुखाला दिलेला चोप चांगलाच चर्चिला जातोय.