बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शुक्रवार, 9 ऑगस्ट 2024 (15:05 IST)

रवींद्र वायकरांची नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची लोकसभेत मागणी

Facebook
नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी रवींद्र वायकर यांनी आज लोकसभेत केली. भारतीय आयुर्मान विधेयक 2024 वर भाष्य करताना त्यांनी लोकसभेत नागरी उड्डयन मंत्रींकडे केली आहे. 
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटीलांचे नाव देण्याच्या प्रस्तावाला ठाकरे सरकार ने मंजुरी दिली होती. त्या नंतर एकनाथ शिंदे-फडणवीस सरकार कडून देखील त्यांचा नावाचा प्रस्ताव मान्य करण्यात आला असून अद्याप नामकरणाचा ठराव कागदावरच आहे. 

रवींद्र वायकर यांनी रत्नागिरी व चिपी विमानतळाचा विकास करण्याची मागणी केली असून सांताक्रूझच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतराष्ट्रीय विमानतळाजवळील झोडपट्टीचा विकास करून त्याठिकाणी अतिरिक्त रनवे तयार करण्याची मागणी केली आहे.

केंद्र सरकार ने देशातील पायाभूत सुविधा साठी 11 लाख 11 हजार 111 कोटी रुपयांच्या निधी ठेवला आहे.  ठेवण्यात आलेल्या निधी पैकी 1 लाख कोटी रुपयांची निधी देण्याची मागणी त्यांनी  केली. जेणे करून येथील झोपडपट्टीचा शासनामार्फत पुनर्विकास करून या ठिकाणी अतिरिक्त रनवे तयार केला जाईल.अशी आणि रवींद्र वाईकरांनी लोकसभेत केली आहे. 
Edited by - Priya Dixit