रविवार, 2 फेब्रुवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: बुधवार, 22 जानेवारी 2025 (16:31 IST)

ठाण्यात व्हेल माशाच्या उलटीची तस्करी, पांच कोटींचा माल जप्त, आरोपीला अटक

whale
सागरी प्राण्यांना पकडणे आणि त्यांची तस्करी करणे हा कायदेशीर गुन्हा आहे. या वर पोलिसांची नजर सतत आहे. दरम्यान बुधवारी ठाणे पोलिसांनी व्हेल माशाची उलटी (अंबरग्रीस  )जप्त केली आहे.या प्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. त्याच्या कडून 5 कोटी रुपयांच्या क़ीमतीचे अंबरग्रीस जप्त करण्यात आले आहे. 

अंबरग्रीस  हा एक घन आणि मेणासारखा चिक्कट पदार्थ आहे. जो स्पर्म व्हेल माशापासून सापडतो.  हे व्हेल माशाच्या आतड्यांमध्ये तयार होतो. याला फ्लोटिंग गोल्ड असे ही म्हणतात.सुगंधी द्रव्य तयार करण्यासाठी याचा वापर केला जातो. 

ठाण्यातील साकेत रोड परिसरात एक व्यक्ति अम्बरग्रीसच्या विक्रीसाठी येण्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे गुन्हे युनिटच्या पथकाने सोमवारी राबोडी परिसरात पाळत ठेवली आणि सापळा रचून एका 53 वर्षीय व्यक्तीला संशयावरून अटक केली. या व्यक्ति कडून पोलिसांना 5 कोटी रुपयांच्या क़ीमतीचे 5.48 किलो अंबरग्रीस जप्त करण्यात आले. पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली आहे.  आरोपीने हा प्रतिबंधित पदार्थ नाशिक येथून एका व्यक्तीकडून आणल्याचे पोलिसांना सांगितले. तो याची विक्री 80 लाखांमध्ये करणार असल्याची माहिती दिली. 
Edited By - Priya Dixit