शुक्रवार, 15 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Updated : बुधवार, 18 ऑगस्ट 2021 (08:14 IST)

केस खाण्याची सवय; डॉक्टरांनी पोटातून काढला ६५० ग्रॅम वजनाचा केसांचा गोळा

The habit of eating hair ”; The doctor removed 650 grams of hair from the abdomen Maharashtra News Mumbai News In Marathi Webdunia Marathi
कल्याण मधील चिंचपाडा येथे राहणाऱ्या एका बारा वर्षाच्या मुलीला वयाच्या दुसऱ्या वर्षापासूनच या मुलीला केस खाण्याची सवय लागली होती. या सवयीला ट्रायकोफेगिया असे म्हणतात. या मुलीच्या पालकांनी तिची ही सवय सुटावी म्हणून खूप प्रयत्न केले होते.परंतु ती सवय सुटली नाही. गेल्या आठवड्यात अचानक मुलीच्या पोटात दुखू लागले. त्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं.ज्यावेळी तिचे वजन फक्त 20 किलो एवढंच होतं. सिटीस्कॅन केल्यानंतर तिच्या आतड्यात पूर्णपणे केस अडकले असल्याचे दिसून आले. मागील गेल्या दोन महिन्यापासून तिला जेवण देखील जात नव्हतं.अखेर हा संपूर्ण प्रकार लक्षात आल्यानंतर डॉक्टरांनी तिच्यावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.
 
पोटावरील गंभीर शस्त्रक्रिया करण्यासाठी लॅप्रोस्कॉपीक पद्धतीचा अवलंब केला जातो. परंतु केसांचा गोळा एवढा मोठा होता की हा गोळा काढताना केस लॅप्रोस्कॉपीक मशीनमध्ये अडकण्याची भीती होती. म्हणूनच ओपन सर्जरीचा मार्ग निवडला गेला आणि भला मोठा केसाचा गोळा मुलीच्या पोटातून काढण्यात डॉक्टर रोहित परयानी,डॉक्टर प्रवीण भुजबळ यांना यश आले.