मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांना कोरोनाची लागण
मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांना सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे. काकाणी यांना गुरुवारी ताप आला आणि अस्वस्थ वाटू लागले होते. त्यानंतर त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यावेळी त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पण झाले. त्यानंतर त्यांना अंधेरीच्या सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मुंबईतील कोरोनाच्या लढाईत गेल्या दीड वर्षापासून पालिका आयुक्त इकबाल चहल यांच्या नेतृत्वाखाली सुरेश काकाणी आरोग्य विभागाची संपूर्ण जबाबदारी यशस्वीरित्या सांभाळत आहेत. पहिल्या दिवसापासून काकाणी कोरोनाच्या लढाई स्वतः झोकून घेतलं आहे. कोरोना लसीकरणांपासून सर्व मोहिमेवर त्यांचे बारकाईने लक्ष आहे. यामुळेच प्रचंड लोकसंख्या असलेल्या मुंबईतील कोरोना आटोक्यात आला आहे.