गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: मंगळवार, 20 एप्रिल 2021 (21:38 IST)

मुंबईत कोरोना रूग्णांच्या संख्येत सलग पाचव्या दिवशी घट

मुंबईत कोरोना रूग्णांच्या संख्येत सलग पाचव्या दिवशी घट झाल्याचा दावा मुंबईचे महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी केला आहे. मुंबईत झालेल्या एकुण ४७ हजार चाचण्यांपैकी ७ हजार मुंबईकरांची कोरोनाची चाचणी पॉझिटीव्ह आल्याची माहिती त्यांनी दिली. मुंबईत सद्यस्थितीला ३६८५ बेड्स रिक्त असल्याचा दावाही आयुक्तांनी केला आहे. मुंबईतील हॉस्पिटलमध्ये एकुण २१ हजार १६९ इतक्या बेड्सपैकी ३६८५ बेड्स रिक्त असल्याची आकडेवारी डॅशबोर्डच्या माध्यमातून आयुक्तांनी जाहीर केली आहे. तर मास्क न वापरणाऱ्या २६ लाख मुंबईकरांना दंड आकारण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मुंबईतील कोरोनाच्या परिस्थितीतही मृत्यूदर कमी असल्याचा दावा आयुक्तांनी केला आहे. दिल्लीच्या तुलनेत मुंबई शहराचा मृत्यूदर हा ०.०३ टक्के म्हणजे दिवसाला सरासरी १३ मृत्यू इतका असल्याची आकडेवारी पालिका आयुक्तांनी जाहीर केली.
 
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला सुरूवात झाल्यापासून मुंबईत २ लाख ६६ हजार इतकी कोरोना रूग्णांची आकडेवारी आहे. तर मुंबईत गेल्या ७० दिवसांमध्ये ९५३ जणांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीत एकाच दिवशी २४० मृत्यू झाल्याची आकडेवारीही चहल यांनी स्पष्ट केली. मुंबईत झालेल्या ४५ हजार इतक्या चाचण्यांमध्ये ७ हजार ७२ जणांच्या चाचण्या पॉझिटीव्ह आल्या. गेल्या पाच दिवसात सातत्याने कोरोना रूग्णांच्या संख्येत घट होत आहे. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचा आकडा हा १० हजारांच्या पुढे गेला होता. पण गेल्या काही दिवसांपासून कोरोना रूग्णांच्या आकडेवारीत घट झाली आहे. मुंबईतल्या कोरोना रूग्णांच्या आकडेवारीत ८७ टक्के नागरिक असिम्पटोमॅटिक असल्याचे समोर आले आहे.