गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शुक्रवार, 1 मार्च 2024 (09:04 IST)

‘बेस्ट’चा पास दीडशेने महाग

double decker buses
रोज प्रवास करणाऱ्या मुंबईकरांनी तिकीट घेण्याऐवजी मासिक पासचा पर्याय निवडला; मात्र या पाससाठी आता जादा पैसे मोजावे लागणार आहेत. ७५० रुपयांऐवजी ९०० रुपये, तर दैनंदिन पाससाठी ५० ऐवजी ६० रुपये द्यावे लागणार आहेत. मासिक पासमध्ये १५० रुपये, तर दैनंदिन पासमध्ये दहा रुपयांची वाढ केली आहे. याची १ मार्चपासून अंमलबजावणी होणार आहे. दैनंदिन तिकिटात वाढ करण्यात आलेली नाही.
 
दैनंदिन आणि मासिक पासनुसार अमर्याद प्रवास, सर्व एसी बसमधून प्रवासाची सुविधा कायम असल्याचे ‘बेस्ट’ने स्पष्ट केले आहे. नव्या सुधारित दरांनुसार ४२ ऐवजी १८ बस पास करण्यात आले आहेत. बस पास सहा रुपये, १३ रुपये, १९ रुपये आणि २५ रुपयांपर्यंतच्या वातानुकूलित आणि विनावातानुकूलित प्रवासभाड्याच्या अनुषंगाने साप्ताहिक आणि मासिक स्वरूपात उपलब्ध करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना २०० रुपयांचा मासिक बस पास उपलब्ध असून या बसपासच्या माध्यमातून अमर्याद बसफेऱ्यांची सुविधा कायम ठेवण्यात आलेली आहे.