शनिवार, 9 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शनिवार, 18 डिसेंबर 2021 (21:29 IST)

१८ विद्यार्थी पॉझेटिव्ह आल्यामुळे ही शाळा सात दिवसासाठी बंद

नवी मुंबईतील घणसोली येथील शेतकरी शिक्षण संस्थेची शाळा सात दिवसांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय पालिका आयुक्तांनी घेतला आहे. या शाळेत अकरावीमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यांचे पालक कतार देशातून आले होते. त्यांची कोरोना टेस्ट केल्यावर त्यांचे अहवाल पॉझेटिव्ह आले. यामुळे खबरदारी म्हणून वर्गातील इतर विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. 
 
शाळेतील एकूण १८ विद्यार्थी पॉझेटिव्ह आल्यामुळे ही शाळा सात दिवसासाठी बंद ठेवण्याचा निर्णय महापालिका आयुक्तांनी घेतला आहे. हि वाढती संख्या पाहून पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यामध्ये चिंतेचे वातावरण आहे. शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी अशा १०२ जणांची कोरोना टेस्ट केली. तसेच पालक आणि विद्यार्थीची टेस्ट करण्यात येत आहे.
 
शेतकरी शिक्षण संस्थेत पाचवी ते १२ इयत्तेपर्यत १६५५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. आतापर्यंत ८१५ विद्यार्थ्यांची टेस्ट करण्यात आली असून सर्व मुलांची टेस्ट केली जाणार आहे