गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शनिवार, 27 जुलै 2024 (10:14 IST)

ठाण्याहून मुंबईला जात असतांना तरुण अडखळून खड्ड्यात पडला, मागून येणाऱ्या ट्रकने चिरडले

death
मुंबई:  ठाण्यासह महाराष्ट्राच्या सर्व भागात मुसळधार पाऊस पडत आहे. संपूर्ण रस्ते जलमय झाले आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. रस्त्यांवर फक्त खड्डेच दिसत आहे. मुंबई-अहमदाबाद महामार्ग दिवसेंदिवस खराब होत चालला आहे. ठाण्यात खड्ड्यांमुळे एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. 
 
ठाण्यातील शीळ डायघर संकुलात खड्ड्यामुळे 22 वर्षीय सागर मिसाळ याचा मृत्यू झाला. गुरुवार-शुक्रवारी रात्री दोनच्या सुमारास सागर कल्याण शिळ रस्त्यावरून नवी मुंबईच्या दिशेने दुचाकीने जात होता. यावेळेस खड्ड्यामुळे त्याचा तोल गेला आणि तो दुचाकीवरून पडला. मागून येणाऱ्या वाहनाने त्यांना चिरडले. गंभीर जखमी सागरला तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी आकस्मिक अपघाताचा गुन्हा दाखल केला होता, मात्र सीसीटीव्ही तपासल्यानंतर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तापास पोलीस करीत आहे.