1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: रविवार, 9 मार्च 2025 (16:08 IST)

नवी मुंबईतील एका हॉटेलमध्ये पार्टी करणाऱ्या महिलांना मंचुरियनमध्ये उंदीर आढळला

खाद्य पदार्थातून मृत प्राणी निघण्याचे प्रकरण समोर येतात.नवी मुंबईत एका हॉटेल मध्ये पार्टी करण्यासाठी गेलेल्या महिलांना मन्चुरिअनमध्ये उंदीर आढळल्याची घटना घडली आहे. महिलांनी हॉटेलच्या मॅनेजर कडे तक्रार करत गोंधळ घातला. 
सदर घटना ऐरोली सेक्टर 4 मध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने काही महिला एका हॉटेल मध्ये जेवायला गेल्या. महिलांनी मन्चुरिअन मागवले. त्यात त्यांना उंदराचे पिल्लू आढळल्याने गोंधळ उडाला. त्यांनी तक्रार केल्यावर हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी चुकीला मान्य केले नाही. नंतर महिलांनी तीव्र निषेध केला यावर हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी आपली चूक मान्य केली.  
महिलांनी रबाळे पोलीस ठाण्यात जाऊन हॉटेलच्या व्यवस्थापनाच्या विरुद्ध तक्रार केली आणि त्यांना जेवणात उंदीर असल्याचे फोटो दाखवले. पोलिसांनी या आधारावर गुन्हा दाखल केला असून पोलिसांचे पथक हॉटेलात पोहोचले आणि हॉटेलची पाहणी केली. 
महिला हॉटेल मालकाच्या आणि व्यवस्थापनाच्या विरुद्ध अन्न विभागाकडे तक्रार दाखल करण्याचे म्हणाल्या.हे लोकांच्या जीवाशी खेळणे आहे. या हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना धडा शिकवणे आवश्यक आहे.जेणेकरून भविष्यात कोणत्याही हॉटेलमध्ये स्वच्छतेची काळजी घेतली जाईल.
Edited By - Priya Dixit