1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: रविवार, 9 मार्च 2025 (15:23 IST)

मुंबईत मेडिकलच्या विद्यार्थ्याला जीवे मारण्याची धमकी देत पैसे उकळले, तिघांवर गुन्हा दाखल

A medical student in Mumbai was extorted
मुंबईतील सर जेजे रुग्णालयाच्या एमबीबीएसच्या विद्यार्थ्याला डोंगरी परिसरात तिघांनी जीवे मारण्याची धमकी देत पैसे उकळल्याची घटना घडली आहे. विद्यार्थ्यांच्या तक्रारीवरून मुंबई पोलिसांनी रविवारी तीन अज्ञात व्यक्तींविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. विद्यार्थ्याने सांगितले ही घटना 5 मार्च रोजी रात्री 9 वाजता घडली.
तो रुग्णालयाजवळ असलेल्या रेस्टोरेंटमध्ये जेवायला गेला असताना घडली. 
जेवायला गेलेला असताना त्याला एकाने बोलावले आणि म्हणाले, तुम्ही या भागात नवीन आहा, काय करत आहात इथे. हा आमचा परिसर आहे. तुम्ही आम्हाला ओळखत नाही का? या वर पीडितने मी तुम्हाला ओळखत नाही म्हटले. यावर त्या माणसाने त्याला बोलण्यात गुंतवले आणि एका गल्लीत घेऊन गेला आणि त्याने आणखी दोघांना बोलावले. त्या तिघांनी विद्यार्थ्याला जीवे मारण्याची धमकी दिली आणि पैसे देण्यास सांगितले.  
या वर पीडित ने माणसाला सांगितले की त्याच्याकडे पैसे नाही नन्तर त्याने आपल्या वडिलांना फोन केला आणि युपीआय वरून 5 हजार रुपये मागवले.त्याने एका मित्राकडून देखील 5 हजार रुपये मागवले. नंतर आरोपीने त्याला क्यूआर कोड स्कॅन करून पैसे पाठवायला सांगितले.पीडित ने पैसे पाठवण्यासाठी चार वेळा ट्रॅन्जेक्शन केले.नंतर पैसे घेऊन आरोप पसार झाले. 
घटनेनंतर पीडित विद्यार्थ्याने डोंगरी पोलिसांकडे जाऊन अज्ञातांच्या विरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी त्याच्या जबाबाच्या आधारे भारतीय दंड संहितेच्या कलम  308(3), 308(2) आणि 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल केले आहे. पोलीस प्रकरणाचा तपास करत आहे. 
Edited By - Priya Dixit