रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 5 जुलै 2016 (17:26 IST)

आठवले, भामरे मंत्रिमंडळात; जावडेकर कॅबिनेटपदी

दिल्ली- महाराष्ट्रातील आरपीआय नेते रामदास आठवले आणि धुळ्याचे भाजपचे खासदार डॉ. सुभाष भामरे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान मिळालं. तर प्रकाश जावडेकर यांची राज्यमंत्रिपदावरुन कॅबिनेटपदी वर्णी लागली आहे. या सर्वांचा शपथविधी आज राष्ट्रपती भवनात पार पडला.
दरम्यान, मोदी-शाह यांनी शिवसेनेला ठेंगा दाखवला. आठवले यांनी सोमवारी सकाळी अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं. आठवले महाराष्ट्रातील प्रमुख दलित नेत्यांपैकी एक आहेत. उत्तर प्रदेशच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यामुळे दलितांची सहानुभूती मिळवण्याचा मोदींचा प्रयत्न असल्याचं बोललं जात आहे.
 
दुसरीकडे मराठा समाजाचे डॉ. भामरे यांची प्रतिमा स्वच्छ राजकारणी अशी आहे. उत्तर महाराष्ट्रातील बिघडलेलं समीकरण दुरुस्त करण्यासाठीचा हा प्रयत्न असल्याची चर्चा सुरु आहे.