शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

ईदच्या प्रार्थनेनंतर दगडफेक, 6 जखमी

श्रीनगर- काश्‍मीर व्हॅलीमध्ये ईदच्या प्रार्थनेनंतर आंदोलकांनी पोलिसांच्या दिशेने दगडफेक केल्याने एका वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यासह 6 पोलिस जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनंतनाग जिल्ह्यात आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीत पोलिस अधीक्षक मुबाशिर बुखारी हे जखमी झाले आहेत. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 
 
सफाकदल भागात झालेल्या दगडफेकीत चार छायाचित्रकार जखमी झाले आहेत. दरम्यान, आंदोलकांवर नियंत्रण मिळविण्यात पोलिसांना यश आले असून, परिस्थिती नियंत्रणात आहे. तसेच ईद दरम्यान हिंसाचार भडकण्याच्या भीतीमुळे शीर्ष फुटीरवादी नेत्यांना नजरबंद केले आहेत, असे अधिकार्‍यांनी सांगितले.