रविवार, 17 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

उत्तराखंडमध्ये 14 हजार फूट उंचीवर पहिल्यांदाच दिसले वाघ

समुद्र सपाटीपासून 14 हजार फूट उंचीवरील हिमालय क्षेत्रात काही दिवसापूर्वी केवळ हिम चित्ते आढळून यायचे. परंतु, आता तेथे वाघांनीही शिरकाव केला आहे. वनविभागाद्वारा वन्यजीवांचे अस्तित्व तपासण्यासाठी कॅमेरे लावण्यात आले होते. या कॅमेरात गेल्या मार्च-एपिल्र महिन्यात वाघाचे फोटो चित्रीत झाले. यामुळे वनविभागातील कर्मचार्‍यांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे. 
या भागात वाघांच्या सुरक्षेला घेऊन वनविभाग चिंतीत आहे. यामुळेच हिमालय क्षेत्रात वाघ दिसल्याची बातमी बराचकाळ समोर येऊ दिली नाही. वाघ आतापर्यंत तीन ते साडे तीन हजार फुटांच्या उंचीपर्यंतच्या भागातच पाहायला मिळायचे. परंतु, वनविभागाद्वारे मागील काही दिवसात 14 हजार फुटांच्या उंचीवर हिमालयीन चित्ते तसेच इतर वन्यजीवांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी लावलेल्या कॅमेरात काही आश्चर्यकारक गोष्टी टिपल्या गेल्या. त्यामुळे सगळीकडे आश्चर्य व्यक्त होत आहे. हे छायाचित्र 3 मार्च 2016 आणि 3 एपिल्र 2016 ला टिपण्यात आले.