मंगळवार, 30 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 29 सप्टेंबर 2016 (17:21 IST)

घातकी देशाविरोधात भारताची कडक भूमीला सीमा भागातील गावे केली खाली

घातकी देश पाकिस्थानला एक धक्का दिल्यावर भारतीय लष्कराने एक महत्वाचे पाऊल उचलले आहे. आपले नागरिक सुरक्षित राहावेत आणि योग्य तो दबाव निर्माण व्हावा म्हणून पाकिस्तानच्या  सीमेरेषेपासून १० किलोमीटर अंतरावर असलेल्या पंजाबमधील काही गावे रिकामी करण्यात आली आहेत. तर या गावातील सर्व  नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. या भागात सीमा सुरक्षा दलाची अतिरिक्त तुकडी तैनात करण्यात आली आहे. त्यामुळे काही दिवस भारत-पाकिस्तानमधील संबंध तणावपूर्ण राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
 
काही दहशतवादी भारतात घुसखोरी करण्यासाठी पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळावर एकत्र आल्याची विश्वसनीय माहिती मिळाल्यानंतर भारतीय लष्कराने या दहशतवादी तळावर हल्ला चढवला होता. या हल्ल्यात अनेक दहशतवादी मारले गेले असल्याची माहिती भारतीय लष्कराचे डीजीएमओ रणबीर सिंह यांनी दिली.