शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: दिल्ली , बुधवार, 31 ऑगस्ट 2016 (12:29 IST)

डी कंपनीला मुळासकट संपवा : सुषमा स्वराज

पाकिस्ताननं जैश-ए-मोहम्मद आणि डी कंपनीला मुळासकट संपवावं. शिवाय मुंबई आणि पठाणकोट हल्ल्यातील दोषींना शिक्षा केल्यानंतरच भारत-पाकमध्ये चर्चा शक्य असल्याचं सुषमा स्वराज यांनी अमेरिका आणि भारताच्या संयुक्त पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं आहे.

भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी भारत दौऱ्यावर आलेले अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री जॉन केरींसमोर पाकिस्तानला कडक शब्दात सुनावलं आहे. कराचीत असलेला दाऊद इब्राहिम आणि हाफिज सईदवर पाकिस्ताननं कारवाई करावी अशी मागणीही स्वराज यांनी केली. दरम्यान, जॉन केरी यांनीही पाकिस्तानला दहशतवाद थांबवण्याचा इशारा दिला आहे.