मंगळवार, 30 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: दिल्ली , बुधवार, 1 एप्रिल 2015 (14:09 IST)

डॉ. सिंग यांना ‘हुशऽऽऽऽऽऽ’ ; सिबीआयची कोंडी?

कोळसा खाण घोटाळ्यात माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना सीबीआय विशेष न्यायालयाने बजावलेल्या समन्सवर सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती आणल्याने डॉ. मनमोहन सिंग यांना दिलासा मिळाला आहे.

 कुमार मंगलम बिर्ला यांच्या हिंदाल्को कंपनीस ओडिशातील तालबिरा-२ हा कोळसा खाणपट्टा देण्यास माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी प्रस्थापित पद्धतीचा भंग करून संमती दिल्याने या खासगी कंपनीस मोठ्या नफ्याचे घबाड मिळाले व परिणामी सरकारी न्येवेली लिग्नाईट कॉपोर्रेशनचे नुकसान झाल्याचे सकृद्दर्शनी दिसते असे मत नोंदवत ‘सीबीआय’ विशेष न्यायालयाने डॉ. सिंग यांना कोळसा खाण घोटाळ्यात आरोपी करत ८ एप्रिल रोजी हजर राहण्यासाठी समन्स जारी केले होते.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने  या समन्सवर स्थगिती आणत सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयला नोटीसही बजावली असून उत्तर देण्यासाठी तीन आठवड्यांची मुदत देण्यात आली आहे.