मंगळवार, 30 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 3 नोव्हेंबर 2015 (15:23 IST)

पाकिस्तानी एजेंट आहे शाहरुख खान, त्याने देश सोडावे ...

आपल्या वाढदिवसानिमित्त देशात सामाजिक असहिष्णुता वाढल्याची गोष्ट बोलून अभिनेता शाहरुख खान राजनेत्यांच्या निशाण्यांवर आला आहे. विश्व हिंदू परिषद (वीएचपी) नेता साधवी प्राचीने शाहरुख खानला पाकिस्‍तान एजेंट म्हटले आहे तर हिंदू महासभाने त्याला देश सोडण्याचा सल्ला दिला आहे.  
 
साधवी प्राचीने सोमवारी म्हटले, 'शाहरुख खान पाकिस्तानी एजेंट आहे. त्यावर राष्ट्रद्रोहाचा मुकदमा चालायला पाहिजे. 'त्यांनी राष्ट्रीय सन्मान परत करणार्‍या सर्व इतिहासकार, लेखक आणि फिल्मकाराविरुद्ध राष्ट्रद्रोहाचा मुकदमा करण्याची मागणी केली आहे.  

साध्वीने प्रश्न उचलले आहे की जेव्हा काश्मिरात लाखो लोकांना मारहाणी करण्यात येत होती तेव्हा शाहरुख खान आणि याच्या सारखे इतर लोकं कुठे होते? जेव्हा काश्मीरच्या लोकांना त्यांच्या जमीन आणि घरातून बाहेर काढण्यात येत होते तेव्हा हे लोक कुठे  होते? जेव्हा ट्रेनमध्ये हिंदू लोकांना जिवंत जाळण्यात आले होते आणि कारसेवकांवर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या तेव्हा हे अवॉर्ड परत करणारे लोक कुठे होते?  
 
साधवी प्राचीने म्हटले की शाहरुखला एवढी देखील तमीज नाही की ज्या देशाच्या लोकांनी त्याला बगेर कुठल्याही भेदभावाने फिल्‍मस्‍टार बनविले, तेच आता हा अवॉर्ड परत करणार्‍यांच्या यादीत सामील झाले आहे.  
 
शाहरुखला कळायला पाहिजे की या देशाचे युवा त्याला आदर्श समजतात. त्याच्या असल्या प्रकाराच्या विधानामुळे काही युवक चुकीचे पाऊल उचलू शकतात.
 
महत्त्वाचे म्हणजे इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार शाहरुख खानने म्हटले, 'भारतातील कोणी देशभक्त सेक्युलरिज्मच्या विरोधात जाऊन मोठी चूक करतो. हो, सिम्बॉलिक गेस्चरमुळे मी देखील (अवॉर्ड) परत करीन. मला असे वाटते की इन्टॉलरेंस वाढत आहे.'