सोमवार, 18 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: दिल्ली , गुरूवार, 26 मे 2016 (14:53 IST)

पुणे-मिरज अंतर अवघ्या तीन तासात

पुणे-मिरज हे अंतर अवघ्या तीन तासात पार करता येणार आहे. पुणे-मिरज-लोंढा या रेल्वेमार्गाच्या दुपदरीकरणासाठी केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे.

रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी रेल्वे बजेटमध्ये पुणे-मिरज-लोंढा या मार्गाचं दुपदरीकरण करण्याची घोषणा केली होती. 467 किलोमीटरच्या या मार्गासाठी 3 हजार 627 कोटींची तरतूद केली असून पुढील वर्षात हे काम पूर्ण करण्यात येईल. पुणे, सातारा, कोल्हापूर आणि सांगली या चारही जिल्ह्यांना जोडणारा हा रेल्वेमार्ग एकपदरी असल्याने अनेक अडचणी येत होत्या. मात्र या निर्णयामुळं रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांना दिलासा मिळणार आहे.